काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार परवडले, पण हे नको : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पैसा आणि ईव्हीएम मशिन्सच्या जोरावर भाजप निवडून येत आहे. ईव्हीएममध्ये फेरफार आहे. म्हणून तर हे निवडून येत आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. 

औरंगाबाद : पैसा आणि ईव्हीएम मशिन्सच्या जोरावर भाजप निवडून येत आहे. ईव्हीएममध्ये फेरफार आहे. म्हणून तर हे निवडून आले, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार परवडले. पण हे सरकार नको, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. 

- राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

- ईव्हीएममध्ये फेरफार आहे. म्हणून तर हे निवडून येत आहेत.

- जेव्हा शिक्क्यांच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात येईल तेव्हा कळेल.

- एटीएमच्या रांगेत आपल्याला उभे करून त्यांनी काळापैसा बाहेर काढला.

- भाजपला आता राम मंदिराची आठवण का होत आहे.

- निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा विषय आणला जात आहे.

- देशात हिंदू-मुस्लिम दंगली घडवायच्या आणि यातून राजकारण करायचे असे भाजपचे सुरु आहे.

- मोदींना आपण कोणता पर्याय शोधतोय का ?

- मोदी पंतप्रधान व्हावे असे सांगणारा भारतामध्ये मी पहिला माणूस होतो.

- आता माणूस बदलला म्हणून माझी भूमिका बदलली.

- भाजप सरकार कोणत्याही गोष्टींची उत्तरे द्यायला तयार नाही.

- नोटांबदीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.

- नोटाबंदीपूर्वी 16 लाख कोटी चलनात होते. आता 18 लाख कोटी चलनात आले हे कसे काय?

- हजारो कोटी रुपये भाजपकडे आले कुठून ? 

- औरंगाबादच्या दंगलीमुळे विप्रोचा प्रकल्प रद्द झाला.

- पैसा आणि ईव्हीएम मशिन्सच्या जोरावर हे निवडून येत आहेत.

- ईव्हीएम रद्द करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी.

- नोटाबंदीनंतर साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

- काही यंत्रणांवर सरकारचा नियंत्रण ही आणीबाणी नाहीतर काय ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार परवडले. पण हे सरकार नको. 

- अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय हे आता लवकरच कळेल. 

- हे सर्व सहन करण्यासाठी काही मर्यादा असतात. 

Web Title: raj thackrey criticizes BJP Governmnet