जालना जिल्ह्याला पुन्हा सत्तेत मिळाला मान : पहा Video

सुभाष बिडे, घनसावंगी
सोमवार, 30 डिसेंबर 2019

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणून काम करत असताना, काही काळ त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क मंत्री व तर जालना जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून दहा वर्षापेक्षा जास्त काळ काम पाहिले आहे.

जालना : घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश टोपे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेताच घनसावंगी तालुक्यात व मतदारसंघात फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. राजेश टोपे यांच्या रुपाने जिल्हयाला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.

घनसावंगी (जि.जालना) विधानसभा मतदारसंघातून १९९९ पासून सातत्याने विजय मिळविणारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांचा घनसावंगी हा मतदारसंघ पूर्ण ग्रामीण भाग.

गोदाकाठी ऊस व मोसंबी बागायतदारांची मोठी संख्या आहे. या भागात समर्थ आणि सागर या दोन सहकारी साखर कारखांने व समर्थ बॅक या सहकारी व मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या आधारे माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी राजकारणात भक्कम पाया रचला. त्यांचा हा वारसा राजेश टोपे पुढे चालवीत आहेत.

Image result for ankushrao tope rajesh tope

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ते राहिले. यशवंत सुतगिरणी, समर्थ  सहकारी बॅक, महाराष्ट्र हॉऊसिंग फायनान्स, मत्स्योदरी शिक्षण संस्था, खोलेश्‍वर बहुद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. १९९९ पासून अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांना रोजगार हमी योजना, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य, तर २००१ मध्ये जलसंधारण, पर्यावरण, उद्योग, वाणिज्य राज्यमंत्रीपद भूषविता आले. 

मोलमजुरी, हमाली, ते मंत्रीपद - वाचा

२००४ च्या निवडणुकीत ४० हजार मतांनी विजयी झालेल्या टोपे यांनी या काळात नगरविकास, जलसंधारण, संसदीय कार्य ,सामान्य प्रशासन, नागरिक जमीन कमाल धारणा या खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर २००८ च्या मंत्रीमंडळात उच्च व तंत्र व वैद्यकीय शिक्षणमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून 
त्यांचा समावेश झाला.

Image result for ankushrao tope rajesh tope

त्यांच्या कार्यपध्दतीचा विचार 

पुन्हा २००९ च्या मंत्रीमंडळात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणून काम करत असताना, काही काळ त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क मंत्री व तर जालना जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून दहा वर्षापेक्षा जास्त काळ काम पाहिले आहे. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय संपादन केला . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात त्यांची नव्याने कॅबीनेट मंत्री पदी निवड झाली.

मतदारसंघात जल्लोष 

जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणला जाईल आणि जिल्ह्याचा सर्वागिण विकासासाठी काम होणार असल्याच्या कार्यकर्त्यानी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी तर काही ठिकाणी पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Tope Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Jalna Breaking News