फडणवीसांचे दिल्ली दरबारी वजन कायम; राजनाथसिंह येणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाजनादेश यात्रेसाठी हजर रहाणे शक्य नसल्याने राजनाथसिंह गुरुकुज मोझरी येथे प्रमुख पाहुणे असतील. फडणवीस यांच्या यात्रेला ते हिरवा झेंडा दाखवतील. संसदेचे अधिवेशन सुरु असतानाही ज्येष्ठ मंत्र्याने जावे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी स्वत: लक्ष दिल्याने दिल्लीला फडणवीस यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आज (गुरुवार) मोझरी येथून सुरवात होत असून, या यात्रेच्या उद्घाटनाला संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाजनादेश यात्रेसाठी हजर रहाणे शक्य नसल्याने राजनाथसिंह गुरुकुज मोझरी येथे प्रमुख पाहुणे असतील. फडणवीस यांच्या यात्रेला ते हिरवा झेंडा दाखवतील. संसदेचे अधिवेशन सुरु असतानाही ज्येष्ठ मंत्र्याने जावे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी स्वत: लक्ष दिल्याने दिल्लीला फडणवीस यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पाच वर्षांत केलेली लोककल्याणकारी व विकासाची कामे जनतेपर्यंत पोचवून त्यांचा आदेश व आशीर्वाद घेण्याकरिता आजपासून महाजनादेश यात्रा प्रारंभ होत आहे. मोझरी येथून या यात्रेस प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnath Singh present on CM Devendra Fadnavis Mahajanadesh Yatra