राजू शेट्टींची राज ठाकरेंशी गट्टी; शेतकऱ्यांच्या प्रश्नी एकत्र 

राजू शेट्टींची राज ठाकरेंशी गट्टी; शेतकऱ्यांच्या प्रश्नी एकत्र 

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (मंगळवार) भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबईतील 'कृष्णकुंज' येथे राजू शेट्टींनी राज ठाकरे यांची भेट घेतली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टींचा पराभव झाला. तर शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले. राजू शेट्टींच्या या पराभवानंतर त्यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याबाबतचे ट्विट मनसेकडून करण्यात आले. 

दरम्यान, राज ठाकरे-राजू शेट्टी या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यांच्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com