राज्यसभा निवडणुक : देवेंद्र फडणवीस ‘ॲक्शन मोड’वर

फडणवीस यांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बोलावून त्यांची गुरुवारी बैठकांचा सपाटा लावला आणि शेवटच्या टप्प्यातील रणनीतीला वेग दिला.
Rajya Sabha Election Home quarantine Devendra Fadnavis is on Action Mode Ashish Shelar Girish Mahajan and Prasad Lad mumbai
Rajya Sabha Election Home quarantine Devendra Fadnavis is on Action Mode Ashish Shelar Girish Mahajan and Prasad Lad mumbaiDevendra Fadanvis

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीतच कोरोनाची लागण झाल्याने ‘होम क्वॉरंटाइन’ असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. फडणवीस यांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बोलावून त्यांची गुरुवारी बैठकांचा सपाटा लावला आणि शेवटच्या टप्प्यातील रणनीतीला वेग दिला.

त्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर बैठका सुरू झाल्या. त्यानंतर भाजपच्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहून, त्यांनी सूचनाही केल्या. मतदानासाठी दहा आमदारांचा गट केला जाणार असून विधानभवनाच्या आवारात देवेंद्र फडणवीस मतदान कसे केले, याची खातरजमा करतील. आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांत्रिक मुद्यांकडे लक्ष देतील.

‘‘आम्ही सांगतो आहोत, त्याप्रमाणे कोणाचेही मतदान बाद होणार नाही, याची खबरदारी घ्याच. आपले तीनही उमेदवार जिंकायलाच हवेत’’, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदरांना ताकीद दिली. भाजपच्या आमदारांची बैठक ताज हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री झाली. तिला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com