मतदान यंत्रावरून चिन्ह हटविण्याचा प्रस्ताव नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

राळेगणसिद्धी - निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या फोटोबरोबर निवडणूक चिन्हही मतदान यंत्रावर कायम राहणार आहे. यापुढील काळातही निवडणूक चिन्ह मतदान यंत्रावरून हटविण्यात येणार नसल्याचे सांगून, तसा कोणताही प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव अजयकुमार वर्मा यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे कळविले आहे. 

हजारे यांनी निवडणूक आयोगास, घटनेचा आधार घेत निवडणुकीत उमेदवाराचा फक्त फोटो असावा व मतदान यंत्रावरील निवडणूक चिन्ह हटविण्यात यावे, असे कळविले होते. त्या पत्रास निवडणूक आयोगाचे सचिव वर्मा यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रावर मात्र हजारे यांनी नाराजी व्यक्त करत चिन्ह हटविण्याचा विचार केला जात नाही, ही घटना देश व समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचे आयोगास कळविले आहे. मुळात देशात 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, त्याच वेळी उमेदवारांना चिन्हावर, तसेच पक्षाच्या नावावर निवडणूक लढविण्यास आयोगाने बंदी घालणे गरजेचे होते. त्या वेळी झालेली चूक आजही तशीच आहे. त्यामुळे देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही, असेही पत्राद्वारे हजारे यांनी निवडणूक आयोगास कळविले आहे.

Web Title: ralegan siddhi news anna hazare voting machine Election Commission