"धमकी देण्यापूर्वी स्वतःची 'औकात' काय याचा विचार करावा"

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धमकी दिली आहे.
Ram kadam and sanjay Raut
Ram kadam and sanjay Rautटिम ई सकाळ

भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांची ईडीने अटक केल्यानंतर राऊत आक्रमक झाल्याचे दिसुन आले. आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, अशी धमकी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिली तर जर मला जेल मध्ये जावं लागलं तर बाजूच्या कोठडीत तुम्ही असाल असा इशाराही राऊतांनी दिलाय. यावर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी संजय राऊतांनी धमकी देण्यापूर्वी स्वतःची 'औकात' काय याचा विचार करावा, असे प्रत्युत्तर दिलेय.

Ram kadam and sanjay Raut
हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; सोलापूर-विजापूर महामार्गावर 'रास्ता रोको'

“शिवसेना नेत्यांचा भ्रष्टाचारचा काळाचीठा आता कागदपत्र आणि पुराव्यासह जनतेच्या समोर आलाय. कोणत्याही क्षणी तुरुंगात जावे लागेल यामुळे भीतीपोटी धास्तावलेले हे नेते आता इतरांना धमक्या द्यायचं काम करतयं. ज्यांचे स्वतःचे हात काळे आहेत त्यांनी इतरांना धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये, अश्या शब्दात राम कदमांनी संजय राऊतांवर जोरदार टिका केली.” धमकी देण्यापूर्वी स्वतःची 'औकात' काय याचा विचार करावा, असे ही कदम म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com