मराठा आरक्षण कोर्टात टिकणे कठीण : आठवले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

खोपोली : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यापूर्वीचे निर्णय पाहता, संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणे कठीण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खोपोलीत केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (अ) कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी खोपोलीत पार पडला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर होण्यास कोणाचाही विरोध नाही, फक्त मंदिराची निर्मिती न्यायालयाच्या निर्णयनुसारच आणि शांततेत व्हावी, ही अपेक्षा आहे. अयोध्येतच भगवान बुद्ध यांचेही स्मारक आणि बुद्ध धर्म अभ्यास केंद्राची निर्मिती करण्यात यावी. याबाबत आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.

भाजप सरकार सध्या चांगले काम करीत असून, बहुजन समाजाला न्याय देत आहे. हे सरकार बहुजनांवर दुर्लक्ष करत नाही. मात्र सरकारचे या समाजाकडे दुर्लक्ष झाल्यास दुसऱ्याच क्षणी सरकारची साथ सोडेल, असे ते या वेळी म्हणाले. 

Web Title: Ramdas Athavale said about Maratha reservation