'शरद पवार यांनी पुन्हा विचार करावा'; रामदास आठवलेंचे वक्तव्य

ramdas athawale invites ncp leader sharad pawar to join nda
ramdas athawale invites ncp leader sharad pawar to join nda

नवी दिल्ली -  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करावा, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त आहे. आठवले म्हणाले की, यामुले देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होईल. शरद पवार सोबत आल्यास महाराष्ट्रात भाजप, एनसीपी आणि आरपीआयची महायुती होईल. यापूर्वी 2018मध्ये रामदास आठवले यांनी पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी आठवले यांनी पवार यांना उपपंतप्रधानपद ऑफर केले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यसभा खासदार आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताच फायदा नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडून जास्ती जास्त पैसे मिळायला हवेत. यासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्यावर विचार करायला हवा. असं झालं तर भाजप, एनसीपी आणि रिपाइंची महाराष्ट्रात महायुती होईल असंही आठवलेंनी सांगितलं. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांना शेतकरी, दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या प्रश्नाबाबत जाण आहे. देशाचे कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. अशा परिस्थिती माझी विनंती आहे की त्यांनी देशाच्या विकासासाठी मोदींसोबत यावं. हे माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपाइंची महायुती व्हावी अशी इच्छाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात वेगळी समीकरणे
महाराष्ट्रात, विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं. परंतु, मुख्यमंत्रिपदावरून युतीचा काडीमोड झाला. त्यावेळी शिवसेना-राष्ट्रावादी-काँग्रेस असं नवं समीकरण उदयाला आलं. मधल्या काळात सत्तेचा तिढा सुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आरपीआयनेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. 

Edited by Raviraj Gaikwad 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com