रशिया-युक्रेन युद्धावर रामदास आठवले यांची कविता; ‘...म्हणून परेशान आहे युक्रेन’

Ramdas Athawale
Ramdas AthawaleRamdas Athawale

अहमदनगर : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यावर प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करीत युद्ध थांबवण्याचे आवाहन करीत आहे. अशात आपल्या कवितेसाठी प्रसिद्ध असेलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन’ असे ते म्हणाले.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबले पाहिजे, असे मत जगभरातून व्यक्त करण्यात येत आहे. कोणी रशियाच्या बाजूने तर कोणी युक्रेनच्या बाजूने उभे आहेत. काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. रशिया (Russia) आणि युक्रेन युद्ध थांबून चर्चेतून मार्ग काढावा आणि शांती प्रस्थापित करावी, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

रामदास आठवले हे कविता व आपल्या कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. ते कोण्याही विषयावर कविता करतात. देशात कोरोनाच शिरकाव झाला तेव्हाही त्यांनी कविता केली होती. ‘गो कोरोना गो कोरोना’ अशी कविता रामदास आठवले (Ramdas athawale) यांनी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

आंदोलनाला भेट देणार

संभाजीराजे यांची भूमिका महत्त्वाची आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला होता. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केले होते. दोन मार्चला आजाद मैदानात त्यांच्या आंदोलनाला भेट देणार आहे. मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही रामदास आठवले (Ramdas athawale) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com