
Ramdas Kadam : मी मुख्यमंत्री होईल म्हणूनच मला पाडलं; रामदास कदमांचा गौप्यस्फोट
खेड : शिवसेना पक्ष आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लवकरच लागणार आहे. मात्र राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यातच शिंदेंना शिवसेना पक्ष चिन्हासहित मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. यामुळे उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून कोकणातील खेड येथे त्यांनी सभा घेतली होती. या सभेला आज एकनाथ शिंदेंची उत्तर सभा होत आहे. विशेष म्हणजे ज्या मैदानावर ठाकरेंनी सभा घेतली होती, त्याच मैदानावर ही सभा आयोजित कऱण्यात आली आहे.
या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. अनेक गोष्टींचा त्यांनी गौप्यस्फोट केला. कदम म्हणाले की, मी दापोलीत निवडणूक लढवायचो. पण मला गुहागरमध्ये पाठवलं. तिथे मला भास्कर जाधवांच्या हातून पाडलं. केवळ स्वत:ला मुख्यमंत्रीपद घ्यायचं होतं म्हणून मला पाडलं. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्री केलं जातं. बाळासाहेबांनी कदाचित मला मुख्यमंत्री केली असतं, असंही रामदास कदम म्हणाले.
नारायण राणे सोडून गेले तेव्हा, एक वर्ष उद्धवजी मला गाडीत बसवल्याशिवाय कुठही जात नव्हते. मला पालकमंत्री कुठं तर संभाजीनगर, नांदेड दिलं. तिथं वायकरांनी योगेशदादाला निधी दिला. तेव्हा एपीला आणला. उद्धवजी सांगत होते, योगेश कदमला पाडण्यासाठी काय-काय करत होते, असं कदम म्हणाले. तसेच उद्धवजी बाळासाहेब रामदास कदम सारख्या वाघाला सांभाळायचे, अन् तुम्ही सुभाष देसाई सारख्या शेळ्या-मेढ्यांना संभाळत आहेत, हाच फरक असल्याची टीका कदम यांनी केली.
बेमानी आम्ही केली नाही. २० आमदार आणि गुलाबराव पाटील गेले, उद्धवजींकडे आणि विनंती केली की, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. राष्ट्रवादीला सोडा. पण तेव्हा तुम्ही सर्वांना गेटआऊट केलं. बाळासाहेबांचे पुत्र असून खोट का बोलता. ९० सालच्या निवडणुकीत उमेदवारासोबत दाऊद होता, तरी घाबरलो नाही. मग भास्कर जाधवांना घेऊन येता का, असा सवाल कदम यांनी केला.