
Ramdas Kadam: "राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही" भास्कर जाधवांना नाच्या म्हणत केली टीका
उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये काही दिवसांपूर्वी सभा घेतली त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. त्यालाच उत्तर देण्यासाठी उद्या रविवारी (19 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथील गोळीबार मैदानामध्ये जाहीर सभा होणार आहे. त्या सभेचे जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम यांनी खेड येथे होणारी सभा ऐतिहासिक सभा होईल. आम्ही फक्त मतदार संघातील लोकांना बोलवणार आहे. अफझल खान कसा सगळं सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता तसं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उद्धव ठाकरे घेऊन आले होते. सभेच्या आधी मातोश्रीवर जोरदार बैठका घेतल्या जात होत्या. प्रत्येकाला विचारलं जात होतं तू किती माणसं आणणार? त्यामुळे आमच्या सभेला त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी राहील असा दावाच रामदास कदम यांनी केला आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार यांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो असंही कदम यावेळी म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार त्यांनी यावेळी मानले आहेत. तर उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मला गुहागर येथे उद्धव ठाकरेंनी पाडले. मी तिथे गाफील राहिलो म्हणत रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्याविरोधात दंडच थोपटलेत. योगेश कदमला पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण आम्ही पुरून उरलो असंही कदम यावेळी म्हणालेत.
पुढे बोलताना कदम म्हणाले कि, योगेश कदमचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न झाले पण ते माझ्यापुढे यशस्वी झाले नाहीत. पण आता 2024 ला भास्कर जाधवला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. बांडगूळ आहे भास्कर जाधव. त्याची लायकी नाही तो नाच्या आहे असंही रामदास कदम यांनी केली आहे.
तर पुढे बोलताना रामदास कदम बोलताना म्हणाले की, भास्कर जाधवला माझं खुलं चॅलेंज आहे. 2024 ला तू आमदार होऊन दाखवं. काहीही झालं तरी मी भास्कर जाधवला आमदार होऊ देत नाही असा इशाराच कदम यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे. योगेश कदमला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण त्याच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी योगेश कदम संपणार नाही, आम्ही ठरविले आहे भास्कर जाधव हा नाच्या असून त्याला मी राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही असेही रामदास कदम म्हणालेत.