
Ramdas Kadam: 'आमचे खोके काढण्याआधी तुम्हाला लाज वाटली पाहिजे' ठाकरेंबद्दल बोलतांना कदमांची जीभ घसरली
खेडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खेडमध्ये शिवसेनेची उत्तर सभा संपन्न होत आहे. या सभेतून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर तुफान फटकेबाजी केली. आमच्यासमोर कुणीही आलं तरी त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कदमांनी दिला.
'पन्नास खोके, एकदम ओक्के' या महाविकास आघाडीच्या उद्घोषणेला रामदास कदम यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ते म्हणाले. खोक्यांचं काय सांगता? तुमचे सगळे खोके एकदिवस मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे.
मराठवाड्यामध्ये खोके वाटून तुम्ही तुमची उंची मी वाढवली आहे. तुमच्या हाताने खोके वाटले आहेत. त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवण्याआधी लाज वाटत नाही का? असं म्हणून त्यांना थेट उद्धव ठाकरेंची लाज काढली. आमच्या खानदानासमोर कुणी आलं तर त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कदमांनी यावेळी दिला.
काय म्हणाले रामदास कदम?
बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर हे दुकान बंद करील
परंतु उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत बेईमानी केली
भास्कर जाधवचे चमचे असतील, त्यांना म्हणावं बघा किती लोक आलेत. रस्ते ब्लॉक झालेत.
शिवसेना कुणाचीय हे एकनाथ शिंदेंनी आता सिद्ध करुन दाखवलंय
उद्धव ठाकरेंनी मलाही पाडण्यासाठी माणूस उभा केला होता.
परंतु जाधवची मला पाडायची औकात काय?
दापोलीतही योगेश कदम यांना पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला
योगेश कदमला पाडण्याच्या गटात उदयजी तुम्ही होतात पण कटात नव्हतात
तुम्ही सुभाष देसाईंसारख्या शेळ्यामेंढ्यांना सांभाळताय