
Uddhav Thackeray Khed Sabha : उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेपूर्वी रामदास कदम बरसले; म्हणाले, धसका घेतलाय हे…
खेड, जि.रत्नागिरी : उद्धव ठाकरे हे आज रामदास कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागीरी मधील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमिवर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी मला व माझ्या मुलाला कायमचे संपवण्यासाठी प्रयत्न केले असा गंभीर आरोप रामदास कदम यानी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी धसका घेतलाय…
रामदास कदम म्हणाले की, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि असेल त्यामध्ये कसलाच फरक पडणार नाही असे रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे येत आहेत म्हणून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून लोक आणण्याची मोठी तयारी चालली आहे. जणू खेडली शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्याची जाहीर सभाच आहे. सभेसाठी बाहेरून लोकं आणली जात आहेत यावरून रामदास कदम यांचा किती धसका घेतलाय हे स्पष्ट होतंय असं रामदास कदम म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
सभेसाठी इथले स्थानिक दोन-चार टक्के तरी आहेत का? नाहीत त्यामुळे त्याची काळजी नाही. पण याला उत्तर १९ मार्चला त्याच मैदाणावर सभा घेऊन व्याजासह दिलं जाईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील असे रामदास कदम यांनी सांगितले.
तसेच संजय कदम यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, त्यावेळी पर्यावरण खात्याला बजेटच नव्हतं. तसेच पर्यावरण खातं हे वेगळं कधीच नव्हतं. वन आणि पर्यावरण असायचं. पण मला काहीतरी द्यायला हवं म्हणून तेवढंच देऊन उद्धव ठाकरेंनी मला बसवलं होतं. तसेच त्यांनी हे आरोप सिद्ध केले नाहीत तर त्यांच्यावर मानहानीचा खटला करणार असल्याचेही कदम म्हणालेत.
मुलाला कसं निवडून आणयचं मला महितीय
संजय कदम यांनी आगामी निवडणूकीमध्ये रामदास कदम यांचा पराभव करणार असं वक्तव्य केलं. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, आगामी निवडणूकीत तो लढणार आणि ५० हजाराच्या लीडने पडणार हे लिहून ठेवा. रामदास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले आहेत, माझ्या मुलाला कसं निवडूण आणायचं मला माहिती आहे. निवडणूकीची काळजी आम्हाला नाही. कालच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या जागेवर खेचून भगवा फडकवला आहे.
पुढे बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पहिले नेते असतील ज्यांनी आपल्या पक्षातील आमदाराला आपणचं संपवायचं आणि दुसऱ्या पक्षातील भाड्यानं विकत घ्यायचं. हे शिवसेना प्रमुखांनी कधी केलं नव्हतं, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. अनिल परबल यांना पाठवून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता. आज बदल झाला नसता तर उद्धव ठाकरे आम्हाला संपवण्यात यशस्वी झाले असते.
पुढे बोलताना रामदस कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना रामदास कदम यांनाच नाही तर त्यांच्या मुलाला देखील कायमचं संपवायचं आहे. उद्धव ठाकरेंना एवढंच सांगेन तुम्ही एकदाच नाही तर शंभर वेळा जरी खेडला आलात तरी रामदास कदम किंवा योगेश कदमला काही फरक पडणार नाही. आमचा लीड तेवढाच वाढेल असे रामदास कदम म्हणाले.