Ramesh Bais : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी घेतली शपथ Ramesh Bais took oath as the newly appointed Governor of the Maharashtr | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh Bais

Ramesh Bais : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी घेतली शपथ

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ आज पार पडला. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राजभवनात शपथविधी दिला आहे. राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे भगत सिंग कोशयारी यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ चर्चेत राहिला होता. आज नवे राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नव्या राज्यपालांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

वादग्रस्त विधानांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारण्यात आला. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते.


कोण आहेत रमेश बैस?

बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.

सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते.