. अखेर शापित रामटेक बंगल्याला मंत्री मिळाला ..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - राजकारण अन ‘अंधश्रध्दा’ यांचा धास्तीदायक संबध असल्याची अनेक उदाहणं आहेत. त्याचप्रकारचं उदाहरण म्हणजे अत्यंत अलिशान असलेला ‘रामटेक’ बंगला...! रामटेक बंगला हा राज्याच्या हेविवेट मंत्र्याचा बंगला...! पण मागील काही घटनांनी शापित झालेला बंगला..! पण या बंगल्याचं शापितपण विसरून पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी तो स्विकारला आहे. आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा बंगला मंत्री जयकुमार रावळ यांना दिला आहे. 

तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे हा रामटेक बंगला सलग पंधरा वर्षे होता. पण भुजबळ कायम वादात अडकून अखेर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी झाले. त्यानंतर सत्ताबदल झाला. राज्यमंत्री मंडळातले हेविवेट मंत्री एकनाथ खडसे यांनी हा अलिशान बंगला घेतला. पण खडसे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले व त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळं ‘रामटेक’ बंगला हा अपशकून असल्याची चर्चा मंत्र्यामधे होती.

उपमुख्यमंत्री पदाच्या मंत्र्याला हा बंगला दिला जातो. त्यामुळे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना हा बंगला मिळेल अशी अटकळ होती. पण त्यांनी तो नाकारला. विनोद तावडे यांनाही सुरूवातीला हा बंगला हवा होता. पण खडसे यांच्या प्रकरणानंतर त्यांनीही कानाला हात लावले. त्यामुळे अत्यंत अलिशान असलेला हा बंगला शापित म्हणून रिकामाच होता. आता पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी या अंधश्रध्देला दूर करत रामटेक बंगला देण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यानी देखील तो रावळ यांना तात्काळ बहाल करत फाईलवर सही केली.

Web Title: Ramtek Bunglow Jaykumar Rawal