Devendra Fadnavis Rakttula| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार रक्ततुला; राणा दाम्पत्याचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Rakttula

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार रक्ततुला; राणा दाम्पत्याचा निर्धार

अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. या क्रार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला करण्यात येणार आहे. या रक्ततुलेवरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.(Rana Cuple Over Devendra Fadnavis Rakttula)

हेही वाचा: वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार?

आजच्या या दहीहंडीच्या पार्श्वभूमीर राणा दाम्पत्यांकडून रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या रक्तदान शिबीरावेळी वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात येणार होती मात्र ती रक्ततुला आता रद्द करण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांच्या वजनाएवढं रक्तदान केलं जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे विदर्भातील मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी आज रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार होती. मात्र, प्रोटोकॅालमुळे फडणवीस यांची रक्ततुला रद्द करण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांच्या वजना इतकं रक्तदान केलं जाणार आहे.

हेही वाचा: ज्योती मेटेंना आमदार करा, संभाजीराजेंची मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान, राज्यात या रक्ततुलामुळे आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंत्रीपद मिळवण्यासाठी रवी राणांना आणखी काय काय करावे लागेल हे येणारा काळच ठरवेल. रक्ततुलाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना खूष करण्यासाठी आणि रवी राणा यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून नवनीत राणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असा खोचक टोमणा मिटकरांनी राणा यांना मारला आहे.

Web Title: Rana Cuple Over Devendra Fadnavis Rakttula

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..