भाजप प्रदेशाध्यक्षपदी रणजित पाटील?

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रणजित पाटील?

मुंबई : राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदी स्थान देण्यात आल्याने त्यांच्या निवडीची शक्यता आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातून सात नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रणजित पाटील यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांचे नाव आता मागे पडले असून, पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पदाचा कार्यकाळही संपत आहे. दानवे-शेलार या दोन्ही नेत्यांची दोन टर्म पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह मुंबई भाजपचा अध्यक्ष कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com