Ranjit Singh Mohite Patil
Ranjit Singh Mohite Patil

Loksabha 2019 : माढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; मोहिते पाटील भाजपमध्ये?

अकलूज : माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव मागे पडत असल्याने मोहिते-पाटील आपला मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील याच्यासह उद्या (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोहिते-पाटलांनी थेट भाजपत प्रवेश करावा, असा सूर करमाळा तालुक्‍यातील मोहिते-पाटील समर्थकांत उमटू लागला होता. एवढेच नाही, आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोहिते-पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे भाजपत प्रवेश करून मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा लढवली पाहिजे, असे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उद्या मुंबईत मोहिते पाटील भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करतील. 

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असताना त्यांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना मिळेल अशी चर्चा सुरू होती. मोदी लाटेत विजयसिंह मोहिते- पाटील यांनी विजय मिळवल्याने पुन्हा एकदा विजयदादांना उमेदवारी मिळेल, असे मोहिते समर्थकांनी गृहीत धरले होते. पवारसाहेबांच्या उमेदवारीनंतर देखील मोहिते-पाटील यांचे नाव मागे पडले आहे. त्यामुळे आता माढ्यातून रणजितसिंह भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com