काँग्रेसच्या अवस्थेवर दानवेंचा विनोदी किस्सा… मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात अधून-मधून विनोदी किस्से सांगत असतात. त्यांच्या बोलण्याने उपस्थितांमध्ये हस्य फुलत असते. असेच किस्से त्यांनी भाजपच्या कार्यसमितीच्या बैठकीत सांगितले आहेत.

मुंबई : रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात अधून-मधून विनोदी किस्से सांगत असतात. त्यांच्या बोलण्याने उपस्थितांमध्ये हस्य फुलत असते. असेच किस्से त्यांनी भाजपच्या कार्यसमितीच्या बैठकीत सांगितले आहेत.

या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसला गळती कशी लागली? आणि आज देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची कशी दुरावस्था झाली आहे, याचा विनोदी किस्सा सांगितला. मी पहिल्यांदा सरपंच झालो तेव्हा ग्रामसेवकाने सांगितलं परवा झेंडावंदन आहे. तुमच्या हाताने झेंडा फडकवायचाय… आमचा युनिफॉर्म होता निळी पँट अन् पांढरा शर्ट… ग्रामसेवक म्हणाले चांगली पांढरी कपडे घालून या… मग बाजारात गेलो आणि खादीचा पांढरा ड्रेस आणला… पण आणलेला ड्रेस झाला मोठा…

मग आईला सांगितलं आई ड्रेस मोठा होतोय.. खालून काप आणि शिवून दे… आई म्हटली बायकोला सांग तुझ्या… बायकोला सांगितलं तर बायको म्हणाली मी आत्ताच तुमच्या घरात आली… मला हे काम शिकवता का.. मग मी आमच्या काकूला सांगितलं.. काकू म्हणाली दोघीही नाही म्हणाल्या… मग मीच उरले का आता….???? सरतेशेवटी या सगळ्यांनी एकमेकांना न सांगता पँट खालून कापली अ्न त्यानंतर ती शिवली… पँट झाली छोटी आणि तिचा झाला बर्मुडा…. काँग्रेसची अवस्था अशी झालीये.!!, असा विनोदी  आणि उपरोधिक किस्सा दानवेंनी सांगितला. त्यावर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना आणि सभागृहात यावेळी जोरदार खसखस पिकली.

महाराष्ट्रात एक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जोडीला 4 कार्याध्यक्ष… 5-5 अध्यक्ष असतेत का कुठं…. काय अवस्था झालीये… असं म्हणत त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

माझ्यासारख्या शेतकऱ्यांचा पोरगा केंद्रिय मंत्री होतो, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते. हे काँग्रेसमध्ये होऊ शकत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी जिंकलेली एकही जागा हरणार नाही, असं काम भाजपच्या कार्यकर्त्यांना करायचं आहे, असं दानवेंनी म्हटलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raosaheb danave Speak about Congress in bjp meeting at mumbai