लसीपोटी वाचलेल्या पैशांतून गरजूंसाठी पॅकेज जाहीर करा- रावसाबेब दानवे

सिद्धीस दिलेल्या पत्रकात दानवे यांनी म्हटले आहे, की लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे
raosaheb danve
raosaheb danveraosaheb danve

जालना: केंद्र शासनाकडून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण (free covid 19 vaccination) केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे राज्याला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. त्यामुळे एकरकमी धनादेश देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने बचत झालेल्या सात हजार कोटींच्या निधीतून पॅकेज जाहीर करावे. त्यातून गोरगरीब, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केशकर्तनालयांचे चालक, टाळेबंदीच्या काळात रोजगारास गमावलेल्यांना आधार द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता.आठ) केली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दानवे यांनी म्हटले आहे, की लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने जनतेस दिलासा मिळणार आहे. आता राज्याला लस खरेदी करावी लागणार नाही. त्यामुळे वाचलेल्या सात हजार कोटींतून गरजूंसाठी पॅकेज जाहीर करावे, तातडीने निधी वितरित करावा.

raosaheb danve
PHOTO : जपानची 'ही' सरोवरे म्हणजे स्वर्गसुखच जणू! एकदा पाहाच

यापूर्वी ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील दमडीही कोणाच्याच खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे सामान्यांत तीव्र नाराजी आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली मोफत लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सरकारने योग्य नियोजन करावे, केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे, राजकारण न करता जनतेच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com