न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, आज आमदारांची बैठक - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

भाजपच्या नेत्यांची आज (मंगळवार) कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची हजेरी होती. महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करतो. विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या नेत्यांची आज (मंगळवार) कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची हजेरी होती. महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

बहुमत आम्हीच सिद्ध करणार : चंद्रकांत पाटील

दानवे म्हणाले, की न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही भाजपच्या आमदारांना एकत्र बोलविले आहे. आज रात्री नऊ वाजता गरवारे क्लबमध्ये बैठक होणार आहे. बहुमत सिद्ध करू असा आम्हाला विश्वास आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve Respecting the decision of the court