माजी राष्ट्रपतींचा मुलगा वंचितकडून लढणार निवडणूक?

माजी राष्ट्रपतींचा मुलगा वंचितकडून लढणार निवडणूक?

मुंबई: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ते अमरावतीतून 'वंचित'चे उमेदवार होवू शकतात. 

शेखावत अमरावती विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. 2014 ला मात्र त्यांचा 36 हजार मतांनी पराभव झाला.

2019 ची तयारी करत असताना त्यांच्या मतदारसंघात 'वंचित' फॅक्टरला महत्व आले आहे. 'वंचित'शिवाय विजय शक्य नसल्याचे लक्षात आल्यानेच शेखावत आंबेडकरांच्या भेटीला आल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com