मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईल: दानवे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मोर्चेकरांनी धक्काबुक्की केली याकडेही लक्ष वेधले असते ते म्हणाले, "शेलार हे मोर्चात गेले होते. पण, काही वेळाने विधिमंडळात परतले होते. त्यांचाही मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने विधानसभेतही निर्णय घेता येत नाही. मराठा मोर्चाबाबत निश्‍चितपणे ठोस निर्णय होईल. यामध्ये कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.''  

मुंबई : मराठा समाजाबाबत फडणवीस सरकार आज निश्‍चितपणे ठोस भूमिका घेईल. तशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. 

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुंबईतील आजचा मराठा मोर्चा खूप मोठा आहे. मराठा समाजाला आरक्षणा मिळण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. सरकार सकारात्मक आहे. भाजपचे सर्व आमदार, खासदारांचा आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यामध्ये दुमत असण्याचे कारणही नाही. 

समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. त्यामुळे सरकारला स्वातंत्र्य नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे काळाशर्ट घालून आज मोर्चात सहभागी झाले आहेत याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले, की यापूर्वीच्या सरकारने घाईघाईत निर्णय घेतल्याने आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. आम्ही मात्र मताचे राजकारण कदापी करणार नाही. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मोर्चेकरांनी धक्काबुक्की केली याकडेही लक्ष वेधले असते ते म्हणाले, "" शेलार हे मोर्चात गेले होते. पण, काही वेळाने विधिमंडळात परतले होते. त्यांचाही मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने विधानसभेतही निर्णय घेता येत नाही. मराठा मोर्चाबाबत निश्‍चितपणे ठोस निर्णय होईल. यामध्ये कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.''  

Web Title: Raoshaeb Danave talked about Maratha Kranti Morcha