देवळाली कॅम्प येथे डॉक्‍टर युवतीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नाशिक - देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या डॉक्‍टर युवतीवर प्रियकरासह तिघांनी बलात्कार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आज सकाळी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित वृषभ मंगल नरबहादूर सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.

पीडित मूळची मुंबईची असून तिच्या पालकांचे देवळाली कॅम्प परिसरात घर आहे. आज दुपारी संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या मंगळवारी (ता. 13) सायंकाळी सातच्या सुमारास संशयित वृषभने मोबाईलवर संपर्क साधून कुठे आहेस, अशी विचारणा केली. त्या वेळी पीडिताने बान स्कूल येथे असल्याचे सांगत, संशयित वृषभ याच्यासह अन्य तिघे त्या ठिकाणी आले. त्यानंतर ते पीडिताच्या घरी गेले. त्या ठिकाणी पीडितेसह संशयित चौघांनी मद्यप्राशन केले. त्याच वेळी संशयितांनी पीडितेच्या मद्यामध्ये गुंगींचे औषध टाकले आणि तिच्यावर बलात्कार केला, असे पीडित युवतीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: rape on doctor girl