उद्धव ठाकरे यांची 'ही' जबाबदारी झाली कमी

वृत्तसंस्था
Sunday, 1 March 2020

- गेल्या काही महिन्यांपासून होती त्यांच्याकडे जबाबदारी.

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादकपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. मात्र, आता हे पद त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यानंतर आता सामनाच्या प्रेसलाईनमध्येही रश्मी ठाकरे यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘राफेल मे महिन्यात दाखल होणार’ 

सामना वृत्तपत्र सुरु झाल्यापासून रश्मी उद्धव ठाकरे या तिसऱ्या संपादक बनल्या आहेत. सामनाच्या प्रेसलाईनमध्ये संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचे नाव आजपासून लावण्यात आले आहे. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सामनाच्या कार्यकारी संपादकपदी कायम आहेत. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सामना मुखपत्र सुरु केले. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

Shivsena

पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्कात वाढ 

...म्हणून बदलले संपादकपद

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून राहणे त्यांना अडचणीचे ठरु शकते, हे लक्षात घेऊन, संपादकपदात बदल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणावरील सुनावणीच्या पूर्वतयारीची घेतली माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashmi Thackeray is now Editor of Saamana Newspaper