Independence Day : तुकडोजी महाराजांची अप्रतिम राष्ट्रवंदना; पाहा तितक्याच सुंदर व्हिडिओच्या रुपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

ऐका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना (व्हिडिओ)

स्वातंत्र्यदिन
मुंबई : तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा...ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अप्रतिम राष्ट्रवंदना आज स्वातंत्र्यदिनानिमित्त तितक्याच सुंदर व्हिडिओच्या रुपात प्रदर्शित झाली आहे. 

तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावचा. विसाव्या शतकातील प्रेरणादायी संतांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भजने आजही गावोगावी गायिली जातात. मराठीसह हिंदीतही त्यांनी रचना केल्या. राष्ट्रवंदना ही त्यातीलच प्रसिद्ध रचना. पारतंत्र्यातील भारतवासियांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यामध्ये संतांच्या अशा काव्याचे महत्व अनन्यसाधारण होते. राष्ट्रवंदना अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून आजही सादर केली जाते. हीच राष्ट्रवंदना भारती यांनी व्हिडिओ स्वरुपात आणली आहे.

या व्हिडिओची संकलना आहे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी श्रीकांत भारती यांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शब्दांना स्वरसाज चढविला आहे श्रेया भारती यांनी. डीएच हार्मनी आणि एसआरएम अॅलन यांचे संगीत आहे. संतोष राम मीना मिजगर यांनी हा व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashtrasant Tukdoji Maharajs wonderful video