राज्यात 33 लाख कुटुंबाना मिळणार 'रेशनकार्ड'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

‘दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेचा प्रारंभ सोमवारी झाला असून, ती १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅसजोड मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई - ‘दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेचा प्रारंभ सोमवारी झाला असून, ती १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅसजोड मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा प्रारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘धूरमुक्त महाराष्ट्र’ ही योजना जाहीर केली होती. आता दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेमुळे महाराष्ट्रातील ४० लाख कुटुंबांना धुरापासून मुक्ती मिळून गॅसजोड मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ration Card 33 lakh Family Devendra Fadnavis