"मी खासदार, मला अडवलं तर..." ; भीमा पाटस कारखान्यात राऊत आक्रमक, पोलिसांना दिला इशारा! | Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : "मी खासदार, मला अडवलं तर..." ; भीमा पाटस कारखान्यात राऊत आक्रमक, पोलिसांना दिला इशारा!

शिवसेना खासदार संजय राऊत भीमा पाटस कारखान्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान  पोलिसांनी त्यांना अडवले आहे. कलम १४४ लावण्यात आली आहे. तरी देखील संजय राऊत कारखाण्याच्या आत गेले आहेत. मला कोणी अडवू शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

भीमा पाटस कारखान्यातील कथित गैर व्यवहार प्रकरणी संजय राऊत आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी संजय राऊत यांनी तीन वेळा अडवले होते. यावेळी राऊत यांनी पोलिसांना इशारा दिला आहे. मला तुम्ही अडवू शकत नाही, मी खासदार आहे. मला अडवलं तर तुमच्यावर हक्कभंग होईल, असे राऊत म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

भीमा पाटस कारखान्याच्या संचालकांवर संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. कारखान्यात ५०० कोटींचे मनी लाँन्ड्रिंग झाले. तसेच कारखाण्यातील ५०० कोटी खासगी कामासाठी वापरण्यात आले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.  

भाजपचे आमदार राहुल कुल हे या कारखान्याचे चेअरमन आहेत. राहुल कुल यांच्याविरोधात संजय राऊत सभा घेणार आहे. राऊत यांनी भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात सीबीआयकडे देखील तक्रार केली आहे.

टॅग्स :Shiv SenaSanjay Raut