esakal | Ravi Rana | पाहुणे म्हणून गेलेल्या कार्यक्रमाचा खर्च माझ्या माथी - राणा
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena amravati president sunil kharate criticized mp navneet and mla ravi rana

पाहुणे म्हणून गेलेल्या कार्यक्रमाचा खर्च माझ्या माथी - राणा

sakal_logo
By
ओमकार वाबळे

विधानसभा निवडणुकीत नियमापेक्षा जास्त खर्च केल्याने अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राज्याच्या निवडणूक आयोगाने दिले आहेत. यासंदर्भातील शपथपत्र निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सांगण्यावरून शिवसैनिकांनी खोटा खर्च दाखवणारे कागदपत्र जमा केल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय.

निवडणुकीत २८ लाख खर्चाची मर्यादा असताना रवी राणा यांनी ४१ लाख ८८ हजार खर्च केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

रवी राणा यांनी हा आरोप फेटाळून लावताना शिवसैनिकांना दोषी ठरवलंय. मी एखाद्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून गेल्यानंतरही त्या कार्यक्रमाचा खर्च माझ्या नावे दाखवण्यात आला, असे राणा म्हणाले. मला अद्याप निवडणूक आयोग किंवा न्यायालयाकडून कोणतीही नोटीस आली नाही. मात्र माझ्याकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्र तयार असल्याची माहिती राणा यांनी दिली.

loading image
go to top