Maharashtra Politics: राणा-कडू वादाची धग अजूनही कायम! रवी राणांकडून घरात घुसून मारण्याची धमकी

ravi rana reaction on bachchu kadu speech in amravati maharashtra politics
ravi rana reaction on bachchu kadu speech in amravati maharashtra politics esakal

मुंबई: धमकी देणाऱ्यांना घरात घूसून मारणार असं वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे, त्यानंतर प्रहारचे नेते बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर या दोघांमधील वाद चांगलाच पेटला होता त्यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणा यांना इशारा दिला होता त्यानंतर या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती त्यानंतर रवी राणा यांनी कडू यांची माफी मागीतली होती. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर हा वाद मिटण्याची चिन्हे होती मात्र राणा यांनी केलेल्या नवीन वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ravi rana reaction on bachchu kadu speech in amravati maharashtra politics
Raj Thackeray: वाद पुन्हा पेटणार? राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केलेले ब्रिजभूषण येणार महाराष्ट्रात

राणा म्हणाले, घरात घुसून..

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे मी स्वतःच हा वाद मिटवला आहे, पण कोणी जर मला दम देत असेल तर.. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. हा बच्चू कडू तर काहीच नाही. तो दम देऊन बोलत असेल तर मी जशास तसे उत्तर देईल. प्रेमाच्या भाषेत रवी राणा एकदा नाही दहादा झुकेल. पण कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारायची पण हिम्मत आहे अशे रवी राणा म्हणाले आहेत.

ravi rana reaction on bachchu kadu speech in amravati maharashtra politics
Sambhaji Bhide : आधी टिकली लाव, मगच मी बोलेन! संभाजी भिडे हे काय बडबडले?

बच्चू कडू काय म्हणालेत..

अमरावती येथे आयोजित मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी आरोप करणाऱ्यांची पहिलीच वेळ आहे म्हणून माफ करतो, इथून पुढं आमच्या वाट्याला गेलात तर सोडणार नाही; असा इशारा बच्चू कडू यांना रवी राणा यांना दिला होता

काय आरोप केलाय..

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. या गंभीर आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com