शेट्टी समर्थक तुपकर आता शेट्टींच्या कट्टर विरोधकाकडे 

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिलेले राजू शेट्टी यांचे समर्थक रविकांत तुपकर आता शेट्टींचे कट्टर विरोधत असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांति संघटनेत प्रवेश करणार आहेत. आज (शनिवार) तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले असून, ते रयत क्रांती संघटनेत प्रवेश करतील.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेले प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे रयत क्रांती संघटनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुद्धा रयत क्रांति संघटनेत प्रवेश घेतील, त्यानुसार असंख्य कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी तुपकर यांनी आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. 

राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुपकर यांनी अचानक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आता ते सदाभाऊ खोत यांच्या सोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मुंबई येथील गरवारे क्लब येथे तुपकर सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती तुपकर यांचे निकटवर्तीय राणा चंदन यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com