रविंद्र जडेजाची शतकी 'तलवारबाजी', भारताचा धावांचा डोंगर

रवींद्र जडेजाने केले वर्षातील दुसरे शतक, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम
ravind rajadeja
ravind rajadeja sakal

Ravindra Jadeja IND vs ENG: रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक झळकावले आहे. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे तिसरे आणि वर्षातील दुसरे शतक आहे. जडेजाने हा पराक्रम इंग्लंडविरुद्धच्या 5व्या कसोटीत केला. जडेजा 104 धावा करून जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा बाऊन्सरचा प्लॅन पाठोपाठ पूल शॉट मारत हाणून पाडला. बुमराहने 16 चेंडूत केलेल्या नाबाद 31 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभारला. ऋषभ पंतनेही याआधी 146 धावा केल्या. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

ravind rajadeja
INDvsENG : जसप्रीत बुमराहने ब्रॉडची केली विक्रमी धुलाई; युवराजची झाली आठवण

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 7 बाद 338 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 8व्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. 31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे. दरम्यान, जडेजाने 13 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. याआधी मार्चमध्ये त्याने मोहालीत श्रीलंकेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. या सामन्यात 194 चेंडूत 104 धावा करून तो बाद झाला.

ravind rajadeja
MCA | बीसीसीआय प्रमाणे मुंबई देखील खेळाडूंना करणार 'करारबद्ध'

रवींद्र जडेजाचे घराबाहेर हे पहिलेच कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने घरच्या मैदानावर दोन्ही शतके झळकावली होती. या सामन्यापूर्वी एजबॅस्टन येथे भारताकडून फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी शतक झळकावले आहे. पण पंत आणि जडेजा या दोघांनीही या सामन्यात शतके झळकावून इतिहास रचला आहे. पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com