राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्यातील अकृषी विद्यापीठातील ४७ महाविद्यालयांना अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे पदवी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार असून, कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमासह काही व्यावसायिक शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्यातील अकृषी विद्यापीठातील ४७ महाविद्यालयांना अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे पदवी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार असून, कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमासह काही व्यावसायिक शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठ कायद्यानुसार नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठे संस्थांकडून प्रस्ताव मागवतात. या प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यास सरकारकडून मान्यता दिली जाते. त्यानुसार यंदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दोन टप्प्यांमध्ये नवीन ४७ महाविद्यालयांना अंतिम मान्यता दिली असून, याबाबतचा सरकारी आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. मान्यता देण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक १३ महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून, त्याखालोखाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीशी संलग्न नऊ महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये एका महिला महाविद्यालयाचाही समावेश आहे. 

Image may contain: text that says "नव्या महाविद्यालयांची संख्या १३ मुंबई विद्यापीठ ३ एसएनडीटी, मुंबई संत गाडगेवावा अमरावती विद्यापीठ ४७ एकण महाविद्यालय १ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संत तुकडोजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ ३ सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे २ गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १ अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ"

अकरावी ॲडमिशनबाबतची 'ती' अट रद्द करा; संभाजी ब्रिगेडने केली मागणी

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नऊ, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चार, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूरमध्ये दोन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत पुणे येथे तीन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे एक आणि गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत गडचिरोली येथील दोन महाविद्यालयांना आणि अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत एका महाविद्यालयास मान्यता देण्यात आली आहे. 

या महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता आली असून, भविष्यात कधीही अनुदान न मागण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर संलग्नता देण्याचा आदेश दिले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recognition of new colleges in the maharashtra state