राज्यात दहा वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 July 2020

राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षांतील ही विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.

मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षांतील ही विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या खरेदीचे एकूण मूल्य ११ हजार ७७६ कोटी रुपये असून, आतापर्यंत ११ हजार ०२९ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच ‘सीसीआय’ने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ‘एफएक्‍यू’ दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे. 

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे पुढच्या निवडणुका एकत्रित लढवल्या जाणार

राज्यात ‘सीसीआय’ व राज्य कापूस पणन महासंघाने कोरोनाच्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी झाली. कोरोनामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. 

केजी ते दुसरी ऑनलाईन शिक्षण; नववीपासून बारावीपर्यंत चार तासिकांची शाळा 

त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोरोनाच्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record purchase of cotton in the state in ten years