'एमआयडीसी'च्या जमिनीवरील प्राप्तिकर वसुली रद्द 

'एमआयडीसी'च्या जमिनीवरील प्राप्तिकर वसुली रद्द 

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीच्या मिळकतीवर प्राप्तिकर विभाग कर आकारू शकत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्राप्तिकर (अपिलीय) न्यायाधिकरणाने दिला आहे. 

या निर्णयामुळे एमआयडीसीला मोठा दिलासा मिळाला असून, प्राप्तिकर विभागाला महामंडळाकडून वसूल केलेले 395 कोटी रुपये 12 टक्के व्याजाने परत करावे लागणार आहेत. तसेच, मागील दहा वर्षांची नऊ हजार कोटींची वसुलीही रद्द होणार आहे. या निकालाचा महाराष्ट्र सरकार पुरस्कृत सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, अशा अन्य महामंडळांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबतची माहिती दिली. 

प्राप्तिकर विभागाने सन 2006 ते 2016 पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून वितरित झालेल्या जमिनीच्या भाडेपट्टीतून मिळणाऱ्या रकमेवर कर वसुली सुरू केली होती. दहा वर्षांतील ही रक्कम नऊ हजार कोटी रुपये होती. वसुलीसाठी प्राप्तिकर विभागाने महामंडळाची बॅंकेतील खाती सील करून 395 कोटी रुपये सक्तीने वसूल केले होते. या विरोधात महामंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली होती. एमआयडीसीने आयकर आयुक्त यांच्या आदेशाविरुद्ध आयकर विभागाच्या अपिलीय न्यायाधिकरणात दाद मागितली होती. जी. एस. पन्नू व रवीश सूद यांच्या पीठापुढे आठवडाभर या प्रकरणाची सुनावणी झाली. पुराव्याच्या छाननीनंतर न्यायालयाने आज निकाल दिला. 

न्यायालय म्हणाले... 
. 9311 कोटींची वसुली रद्द 
. 395 कोटी वसुलीवर 12 टक्‍के व्याजाचे आदेश 
. महामंडळाच्या भाडेपट्‌टीवर कर लावता येणार नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com