चोक्‍सीवरील कारवाईला स्थगितीस नकार

सकाळ वृत्तसेवा
03.00 AM

‘काहीही संबंध नाही’
पीएनबी बॅंक गैरव्यवहार प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून आपल्याला नाहक अडकवले जात आहे, असा दावा चोक्‍सीने केला आहे. या प्रकरणात चोक्‍सी व हिरे व्यापारी नीरव मोदी हाही आरोपी आहे.

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) यांनी चोक्‍सीच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले असून, त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात त्याने परदेशातून याचिका केली होती. विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील काही साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्याने केली होती. 

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

यावर बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले. सुधारित कायद्यानुसार आरोपींवर केलेली कारवाई थांबवणे अयोग्य आहे. त्यामुळे तपास कामात समस्या निर्माण होऊ शकतात, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. 

चोक्‍सी मागील कित्येक महिन्यांपासून परदेशात असून, प्रकृतीचे कारण देऊन न्यायालयात हजर राहात नाही. अनेकदा समन्स बजावले, तरी तो उत्तर देत नसल्याचे ईडीतर्फे सांगण्यात आले. ईडीने त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refuse to postpone action on the hoax