मंत्रिमंडळात प्रादेशिक समतोल साधण्यावर भर

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे.

मुंबई - राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष भाजप सत्तेपासून दूर गेल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणार आहे. या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. तसेच, तरुणांचे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत. शिवसेनेच्या मंत्रिमंडळात जुन्यांसह नव्याने निवडून आलेल्या नेत्यांचा समावेश असेल. शिवसेनेकडून महिला प्रतिनिधी म्हणनू प्रा. मनीषा कायंदे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता कमी आहे. 

मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे

आदित्य ठाकरे, मनीषा कायंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संजय शिरसाट, बच्चू कडू, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, अनिल बाबर किंवा शंभूराज देसाई.

छगन भुजबळ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, मकरंद पाटील, हसन मुश्रीफ.

विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, के. सी. पडवी, पृथ्वीराज चव्हाण, विश्‍वजित कदम, सतेज पाटील, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: regional balance in Cabinet