Vidhan Sabha 2019 : राज ठाकरेंचं प्रचार गीत, आता शरद पवारांच्या व्हिडिओला!

टीम ई-सकाळ
Tuesday, 1 October 2019

महाराष्ट्राचं राजकारण हे एका नावाभोवती फिरतं ते म्हणजे शरद पवार. याचा प्रत्यय नुकताच सगळ्यांना आला. तर मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांच्यासाठी लढणारे नेतृत्व म्हणजे राज ठाकरे, अशी या दोन्ही नेत्यांची स्वतःची ओळख आहे.

पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले.

अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. वयाच्या 79 व्या वर्षीही ते एखाद्या तरुणाला लाजवेल अशा तडफेने पक्षासाठी राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या एका चाहत्याने सरळ मनसेचं 'तुमच्या राजाला साथ द्या' हे गाणंच शरद पवार यांच्या प्रचारासाठी वापरलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचं 'आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशांतून घुमला, राष्ट्रवादी पुन्हा' हे एवढं भारी गाणं असताना मनसेचं गाणं सरळ सरळ वाजवलं जातंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेही याबद्दल एक चकार शब्द काढत नाहीय. त्यामुळे राहून राहून शंका आली की, हे गाणं नक्की मनसेचं आहे? की मनसेच राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. 

महाराष्ट्राचं राजकारण हे एका नावाभोवती फिरतं ते म्हणजे शरद पवार. याचा प्रत्यय नुकताच सगळ्यांना आला. तर मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांच्यासाठी लढणारे नेतृत्व म्हणजे राज ठाकरे, अशी या दोन्ही नेत्यांची स्वतःची ओळख आहे. शरद पवार यांच्या बद्दल राज यांना किती आदर आहे, हे ते नेहमी भाषणांमधून सांगत असतात.

शरद पवार यांच्या पंचाहत्तरीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देखील राज बोलले होते. तसेच 21 फेब्रुवारी 2018 ला पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती. जी राजकीय वर्तुळात आजही चर्चिली जाते. मध्ये एकदा दुष्काळी दौऱ्यानिमित्त राज औरंगाबादला विमानाने निघाले होते, तेव्हा त्याच विमानात असलेल्या शरद पवार यांच्याशी राज यांची भेट झाली होती. 

राष्ट्रवादी आणि मनसे दोन्ही पक्षांचे विचार आणि भूमिका वेगवेगळ्या आहेत आणि जशी राजकीय परिस्थिती निर्माण होते, त्या नुसार वेळोवेळी या पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीत मनसेला सामील करण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक होती. मात्र, दुधात मिठाचा खडा पडावा तसा ऐनवेळी काँग्रेसने आपला निर्णय बदलला आणि सगळ्या चर्चा व्यर्थ ठरल्या.

त्यावेळी राज ठाकरे यांनी आघाडीला जाहीर पाठिंबा न देता आपल्या भाषणांमधून भाजप-सेना युतीच्या विरोधात तोफा डागल्या. याचा कोणताही परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झाला नसला तरी मनसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनावर थोड्या प्रमाणात का होईना, दिसून आला. आता तर थेट मनसेचं गाणचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसाठी वापरलं जातंय.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- ... यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाकने दिले निमंत्रण!

- उपचारासाठी बुमरा जाणार लंडनला 

- Vidhan Sabha 2019 : पश्चिम महाराष्ट्रात भाजपमधील पहिली बंडखोरी

- रोहित पवार म्हणतात, अजित दादांमुळेच माझं लग्न झालं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relation between MNS leader Raj Thackeray and NCP leader Sharad Pawar