आमदारांचे नातेवाईक सांगून पोलिसाला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

शेवगाव : शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांचे नातेवाईक असल्याचे सांगून एकाने येथील पोलिस ठाण्यातील निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांना सहा लाख 20 हजार रुपयांना गंडा घातला. याबाबत ओमासे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ हरिश्‍चंद्र इसारवाडे (रा. गदेवाडी) याच्याविरुद्ध काल रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी इसारवाडे याने 10 फेब्रुवारी ते पाच ऑगस्ट 2018 दरम्यान आमदार मेटे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी मोबाईलवर (क्रमांक 9423249191) बोलण्यास सांगितले. अज्ञात साथीदाराच्या मदतीने मेटे यांच्या आवाजात वेगेवगेळ्या कारणांसाठी पैसे घेतले. आपली सहा लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली. 

Web Title: relatives of the MLAs tell the police