नातलगांपासून धोका असलेल्या बहिणींना पोलिस संरक्षण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - मर्जीने विवाह केलेल्या एका मुलीने आणि तिच्या बहिणीने आपल्या नातेवाइकांकडून धोका असल्याने पोलिस संरक्षण देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने त्यांना संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले आहेत. 

आम्ही तीन वर्षांचे असताना आई-वडिलांनी आमचा विवाह केला होता आणि आता कथित पतीकडे जाण्याचा आग्रह ते आणि अन्य नातेवाईक करत आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकादार मुलीपैकी एकीने गेल्या वर्षी प्रेमविवाह केला; मात्र या विवाहाला त्यांच्या घरच्यांनी संमती दिलेली नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीत अनोळखी व्यक्तींनी आपल्या पतीला मारहाण केली होती आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार एका याचिकादार मुलीने पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर याप्रकरणी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. आपल्याला आपल्या नातेवाइकांकडून धोका असल्याने या बहिणींनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. न्या. रणजित मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी या याचिकेवर न्यायमूर्तींच्या दालनात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही याचिकादारांना पुढील सुनावणीपर्यंत पुरेसे पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: relatives of the threat from police protection