Anil Parab: साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

Anil Parab: साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा?

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या ईडीच्या आरोपपत्रातून आरोपी म्हणून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा अनिल परब यांच्यासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.

ईडीच्या आरोपपत्रात जरी अनिल परब यांचं नाव आरोपी म्हणून नसलं तरी देखील या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास अजुनही सुरू असल्याचं या आरोपपत्रात ईडीने म्हटलं आहे. तर या प्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत. तर दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.