राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला दिलासा; अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब I Hasan Mushrif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya vs Hasan Mushrif

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचा (Money Laundering) आरोप करुन ईडीकडं मुश्रीफांविरोधात तक्रार केली होती.

Hasan Mushrif : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला दिलासा; अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब

Hasan Mushrif News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होत आहे. मात्र, आज त्यांना काहीअंशी दिलासा मिळालाय.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब करण्यात आलीये, त्यामुळं पुढील सुनावणीपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे.

ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतलीये. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय.

मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory) कथित गैरव्यवहारांच्या आरोपाखाली आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचा (Money Laundering) आरोप करुन ईडीकडं मुश्रीफांविरोधात तक्रार केली होती.

मुश्रीफांना चौकशीसाठी समन्स

ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतरही मुश्रीफांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. कोर्टात धाव घेऊन त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टानं त्यांना काही दिवसांसाठी दिलासाही दिला. पण, कोर्टानं त्यांना धक्का देऊन त्यांच्या अटकेपासून संरक्षण काढून घेतल्यानं एक मोठा धक्का दिला.

मुश्रीफांना दिलासा नाहीच

दरम्यान, आज हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब करण्यात आल्यामुळं मुश्रीफांचे अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयानं मुश्रीफांना कोणताही दिलासा दिलेला नाही, त्यामुळं मुश्रीफांच्या अडचणी कायम आहेत. येत्या काही दिवसांत त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.