Vidhan Sabha 2019 : 'काँग्रेसला महाराष्ट्रातून साफ करा'

Vidhan Sabha 2019 : 'काँग्रेसला महाराष्ट्रातून साफ करा'

पनवेल : दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्याची प्रथा आपल्याकडे आहे, तशीच साफसफाई महाराष्ट्रातून कॉंग्रेसची करा, दिवाळीपूर्वी 21 ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत भाजपला बहुमत देऊन कॉंग्रेसची महाराष्ट्रातून साफसफाई करावी, असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी खारघर येथे केले.

पनवेल विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रुपाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी महाराष्ट्रात स्थिर सरकार निवडून देण्याची विनंती केली. गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून स्थिर सरकार असल्याने आज देशभरात गुजरात मॉडेल प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आली. कच्छसारख्या दुष्काळी भागात मोदी सरकारने पाणी आणले.

आज गुजरात देशभरात विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मोदींमुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com