लातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांना सर्वाधिक ऊस ऊत्पादनासाठी ऊस भूषण पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कारांचे वितरण १५ डिसेंबर रोजी मांजरी येथील व्हीएसआयच्या वार्षिक सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. व्हीएसआयच्या वतीने दर वर्षी सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजकता, आर्थिक व्यवस्थापन भूषण अशा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. या वेळी व्हीएसआयचे कृषी व तंत्रज्ञान विभागाचे संचालक विकास देशमुख, मुख्य अभियंता के. आर. पाटील आदी उपस्थित होते.

वसंतदादा  शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय)ऊसभूषण पुरस्कारही जाहीर झाले आहेत. २०१७-१८ हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ भागातील शेतकरी चवगोंडा पाटील यांना पूर्वहंगामी गटात, साताऱ्याच्या कोरेगाव भागातील सौरभ कोकीळ यांना सुरू गटामध्ये, तर कोल्हापूरच्या हातकणंगले भागातील मारुती शिंदे यांनी खोडवा गटात पहिला क्रमांक पटकावल्यामुळे ते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Web Title: Rena Sugar Factory Best