तुम्ही टेन्शनमध्ये आहात? बॉय-फ्रेण्ड भाड्याने मिळेल

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

'आरएबीएफ' असे या अॅपचे नाव आहे. 15 ऑगस्टपासून अॅप लॉन्च करण्यात आले आहे. जागरुकता निर्माण करणे हा एकमेव या अॅप सुरु करण्यामागचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आता चक्क बॉय-फ्रेण्ड भाड्याने मिळू शकणार आहे. त्यासाठी 'रेट अ बॉय-फ्रेण्ड' हे अॅप सुरु करण्यात आले असून, सध्या फक्त मुंबई आणि पुण्यातच ही सुविधा उपलब्ध आहे.

या अॅपची संकल्पना पुरुष मित्र अशीच असून, त्यामुळे त्याचे नाव बॉय-फ्रेण्ड असेच ठेवले आहे. सहसा बॉय-फ्रेण्ड म्हणजे प्रियकर अशी सहसा संकल्पना असते. पण, या अॅपमध्ये बॉय-फ्रेण्ड असे वेगळे शब्द लिहिण्यात आले आहेत. या अॅपमधील नियमानुसार मानसिक तणाव घालविण्यासाठी फक्त याचा वापर करण्यात येणार आहे. इतर कारणासाठी नाही.

मुंबई आणि पुणे शहरात मर्यादित असलेली ही सुविधा लवकरच अन्य शहरात विस्तारीत करण्यात येणार आहे. नैराश्य हे कोणत्याही वयात येवू शकते. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होऊन विविध अपघात होऊ शकतात. मन मोकळे करण्यासाठी खास या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वसामान्य व्यक्तीसाठी अवघ्या काही रुपयांत याचा फायदा घेता येणार आहे. तर, सेलिब्रिटीसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. 

'आरएबीएफ' असे या अॅपचे नाव आहे. 15 ऑगस्टपासून अॅप लॉन्च करण्यात आले आहे. जागरुकता निर्माण करणे हा एकमेव या अॅप सुरु करण्यामागचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Web Title: Rent a boy friend app launched