पत्रकार पुरस्कारांत "सकाळ'चा डंका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

राज्य शासनाच्या वतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. 2017 साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे, सकाळ, कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप आहे. तर 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे इतर सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.

पुरस्कार खालीलप्रमाणे-
वर्ष-2016 - सकाळ समूह
- आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारुती कंदले, प्रतिनिधी, ऍग्रोवन, मुंबई
- नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्‍वर बिजले, प्रतिनिधी, सकाळ, पुणे
- दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, सकाळ, नगर- (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्राव्यतिरिक्त रुपये 10 हजार दैनिक गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
- सोशल मीडिया पुरस्कार (राज्य स्तर) प्रफुल्ल सुतार, ई-सकाळ, कोल्हापूर

वर्ष-2017 - सकाळ समूह
- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्य स्तर) -लुमाकांत नलावडे, बातमीदार, सकाळ, कोल्हापूर
- नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, सकाळ, सोलापूर
- ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजित डाके, जिल्हा प्रतिनिधी, ऍग्रोवन, सांगली

अन्य बातमीदार - 2016
- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्य स्तर) राजेश जोष्ठे, पुढारी, रत्नागिरी.
- अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्य स्तर) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
- बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्य स्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, भास्कर, मुंबई
- मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्य स्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड
- यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. वज.) (राज्य स्तर) - वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्य स्तर) कपिल श्‍यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
- तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्य स्तर) शैलेश जाधव छायाचित्रकार, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
- केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्य स्तर) प्रज्ञेश कांबळी, छायाचित्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्य स्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, तरुण भारत, सातारा.
- अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, लोकमत, लातूर
- शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - माधव डोळे, ब्युरो चीफ, सामना, ठाणे
- ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - संजय वालावलकर, प्रतिनिधी, पुढारी, सिंधुदुर्ग
- लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनुप गाडगे, प्रतिनिधी, दिव्य मराठी, अमरावती
- ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, लोकसत्ता, नागपूर

अन्य बातमीदार वर्ष-2017 -
- अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्य स्तर) - मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, हितवाद, नागपूर
- बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्य स्तर) - राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, नवभारत टाइम्स, मुंबई
- मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्य स्तर) - खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, इन्कलाब, मुंबई
- यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्य स्तर) डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
- पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्य स्तर) - कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली
- तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्य स्तर) - दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, लोकमत, मुंबई
- केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्य स्तर) - मनीष झिमटे, छायाचित्रकार, अमरावती
- सोशल मीडिया पुरस्कार (राज्य स्तर) - संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई
- स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्य स्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, दैनिक यशवंत, उस्मानाबाद
- दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - अमोल पाटील, वार्ताहर, दिव्य मराठी, धुळे - 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
- अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - जितेंद्र विसपुते, उपसंपादक, पुढारी औरंगाबाद
- आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, लोकमत, मुंबई
- शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, तरुण भारत, रत्नागिरी
- लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, पुण्यनगरी, अकोला
- ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र टाइम्स, गोंदिया

Web Title: Reporter Government Award Sakal Topper