आरक्षणाची लढाई कायद्याच्या चौकटीत लढा - योगेंद्र यादव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले. 

पुणे - मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले. 

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्या वेळी ‘सकाळ’शी संवाद साधताना यादव म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाला फक्त महाराष्ट्रातील मराठा सामाजाच्या दृष्टिकोनातून बघू नका. याच प्रकारच्या आरक्षणाची मागणी गुजरातमध्ये पटेल यांनी केली आहे. आंध्र प्रदेशातील कापू समाज, हरियाणामधील जाट यांनीही अशी मागणी केली आहे. या सर्व जाती प्रभावी असल्या, तरीही त्या प्रामुख्याने शेती व्यवसायाशी संबंधित आहेत. या सर्व समाजातील एक छोटा भाग आता गावातून शहरांमध्ये स्थलांतरित झाला आहे. यांनी शहरात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. पण, मुख्यतः गावात राहिलेल्या समाजातील लोकांची अवस्था बिकट झाली आहे. शेतीत पैसा राहिला नाही. शेती हा तोट्याचा धंदा झाला आहे. तसेच, गावात बेरोजगारी आहे. या दोन कारणांमुळे या जातिसंस्थांकडून आरक्षणाची मागणी वाढत आहे.’’

शेतकरी वाचतील कसे... 
दूध हा शेतकऱ्यांच्या अस्तित्व टिकविण्याचा शेवटचा पर्याय आहे. ज्या एका लिटर दुधासाठी आपण शहरांमध्ये ५५ ते ६० रुपये मोजतो, त्यापैकी दूध उत्पादकाला जेमतेम वीस रुपये मिळतात. त्यामुळे शेतकरी कसे वाचतील, असा सवालही यादव यांनी केला. 

Web Title: Reservation fight in the framework of the law yogendra yadav