मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणावर घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नांदेड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हदगाव आणि धर्माबाद येथील प्रचार सभेत अनुक्रमे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि छावाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावर घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला; मात्र पोलिसांनी लगेच या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

हदगावमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी "मराठ्यांना आरक्षण अगोदर द्या' च्या घोषणा दिल्या. धर्माबाद येथील सभेत "छावा'चे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे व अन्य कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. हदगाव येथे घोषणाबाजी करत असताना माजी खासदार सुभाष वानखेडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी, पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे कळताच शिवसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पोलिस ठाणे गाठले. "अगोदर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सोडा, ते गुन्हेगार नाहीत, त्यांनी केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे मांडला' अशी भूमिका पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्याकडे मांडली. या वेळी पोलिस व आमदार आष्टीकरांमध्ये चकमक उडाली.

Web Title: reservation shouted slogans chief minister meeting