रिझर्व्ह बॅंकेकडून वितरणात 5.92 लाख कोटींच्या नोटा

पीटीआय
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर 5.92 लाख कोटी रुपयांच्या नोटा वितरणात आणण्यात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी दिली. याचवेळी रिझर्व्ह बॅंकेकडे 10 डिसेंबरपर्यंत 12 .44 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

पाचशे व दोन हजार रुपयांच्या 2.2 अब्ज नव्या नोटांचे 10 नोव्हेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत वितरण करण्यात आले आहे. जुन्या नोटांच्या तुलनेत वितरणात आलेल्या नोटांचे प्रमाण खूपच कमी आहे. नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने पुरेशा नोटांचा पुरवठा होण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या काळात 5 लाख 92 हजार 613 कोटी रुपयांच्या नोटांचे वितरण केले आहे. बॅंक आणि एटीएममधून हे वितरण झाले आहे.
 
एकूण 20.4 अब्ज नोटांचा पुरवठा
नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर 9 नोव्हेंबरला बॅंका बंद होत्या. तसेच, देशभरातील 2.20 लाख एटीएमही बंद होती. रिझर्व्ह बॅंकेने बॅंका, बॅंकांच्या शाखांना वितरणासाठी 22.6 अब्ज नोटांचा पुरवठा केला आहे. यातील 20.4 अब्ज नोटा 10, 20, 50, 100 रुपयांच्या तर पाचशे व दोन हजारच्या 2.2 अब्ज नव्या नोटांचा समावेश आहे.

Web Title: The Reserve Bank's currency distribution 5.92 lakh crore